Reels Watching Side Effects: सावधान! तासनतास रिल्स पाहणं पडेल महागात; केवळ वेळच नाही तर आरोग्याचंही होतंय मोठं नुकसान

Manasvi Choudhary

रिल्स पाहण्याची सवय

रिल्स पाहणे प्रत्येकासाठी काही नवीन नाही. आजकाल घराघरात लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण रिल्स पाहतात.

Reels Watching Side Effects

नवीन व्हिडीओ

मोबाईलमध्ये रिल्स पाहताना एकापाठोपाठ येणारे नवीन व्हिडीओ आपण सर्वचजण आवडीने पाहतो.

Reels Watching Side Effects

आरोग्यावर गंभीर परिणाम

पण तुम्हाला माहितीये का? रिल्स पाहण्याची ही सवय केवळ तुमचं मनोरंजन करत नाही त्याचा परिणाम आरोग्यावर देखील होतो आहे.

Reels Watching Side Effects

रात्री झोपमोड होते

अनेकजण दिवसाच नाही तर रात्री झोपण्यापूर्वी देखील मोबाईलवर रिल्स पाहतात रात्री उशिरा रिल्स पाहिल्यामुळे मोबाईलचा 'ब्लू लाईट' मेंदूला जागृत ठेवतो. यामुळे 'मेलाटोनिन' हार्मोनची निर्मिती घटते आणि झोपमोड होते.

Reels Watching Side Effects

पचनक्रियेत अडथळा

अनेकदा लहान मुलांना आपण मोबाईलमध्ये रिल्स पाहून जेवताना बघितलं असेल पण असे केल्याने त्यांचे लक्ष अन्नावर नसते. यामुळे अन्न नीट चावले जात नाही आणि गॅस, ॲसिडिटी किंवा अपचनाचा त्रास सुरू होतो.

Reels Watching Side Effects

मेंदूवर ताण आणि अस्वस्थता

रिल्समध्ये शॉर्ट व्हिडीओ आपण स्क्रोल करतो यावेळी व्हिडीओचा स्पीड अधिक असतो त्याच वेगाने माहिती ग्रहण केल्याने मेंदूवर ताण येतो ज्यामुळे चिडचिड, भीती आणि अस्वस्थता वाटू लागते.

Reels Watching Side Effects

ही घ्या काळजी

रिल्स पाहणं हे चुकीचे नाही आहे तर तुम्ही रिल्स पाहण्याची वेळ कमी केली पाहिजे. सतत रिल्स बघितल्याने आरोग्याला त्रास होतो.

Reels Watching Side Effects

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Young Age Heart Attack Reason: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचं हार्ट अटॅकमुळे मृत्यू, कमी वयात हार्ट अटॅक येण्याची नेमकी कारणे काय?

येथे क्लिक करा..