Manasvi Choudhary
प्रसिद्ध अभिनेत्री दिव्याांका सिरोहीच्या निधनाने सिनेसृष्टीत खळखळ उडाली आहे.
वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी दिव्यांका सिरोहीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
माहितीनुसार, अचानक दिव्यांकाच्या छातीत दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिव्यांकाला तपासल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला.
यानुसार कमी वयात हृदयविकाराच्या झटका येण्याची कारणे कोणती आहेत? काय काळजी घेतली पाहिजे? ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
सध्या तरूणांमध्ये हार्ट अटॅक येण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याआधी वृद्धापकाळात हार्ट अटॅक येण्याच्या समस्या होत्या मात्र आता कमी वयात हार्ट अटॅकचा सामना तरूणांना करावा लागत आहे.
कमी वयात हृदयविकाराच्या समस्या या जेनेटिक्समुळे उद्भवू शकतात यामुळे वेळीच सतर्क राहून काळजी घ्या.
तणाव, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, तेलकट- तिखट पदार्थांच्या अतिसेवनामुळे हृदयरोगाचा धोका वाढत आहे.
सतत बसून काम करणे, खाण्यापिण्याच्या वेळा न पाळणे यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवते. वजन वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो.
ताण, खराब झोप, धूम्रपानाच्या सवयी, चयापचय, मधुमेह, उच्च रक्तदाब या गंभीर आजारांमुळे हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो.