ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कडुलिंबाचे झाड हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तसेच अनेक आरोग्याची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
कडुलिंब हे त्वचेच्या समस्येपासून ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. कडुलिंबाचे आणखी फायदे कोणते, जाणून घ्या.
मुलतानी माती किंवा चंदन पावडरमध्ये कडुलिंबाची पाने मिसळून चेहऱ्यावर लावल्यानेही पिंपल्स कमी होणयास मदत होते.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट टाळूला लावल्याने बॅक्टेरियाचे संक्रमण कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे कोंडा कमी होतो. जर तुम्हाला टाळूला जास्त खाज येत असेल तर कडुलिंबाची पाने उकळा, थंड करा आणि त्या पाण्याने केस धुवा.
तोंडाच्या आरोग्यासाठी कडुलिंबाचे पाने फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या लाकडाने दात घासल्याने दात आणि हिरड्या मजबूत राहण्यास मदत होते.
डास आणि कीटकांना पळवण्यासाठी कडुलिंबाची वाळलेली पानांचा दूर करा. यामुळे डास पळून जातील.
रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर सकाळी दोन किंवा तीन कडुलिंबाची पाने चावून खाणे फायदेशीर मानले जाते. परंतु प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.