ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दागिन्यांची नियमित स्वच्छता केल्याने दागिने नवीन दिसतात आणि चमक टिकून राहते.
बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट बनवा आणि ती दागिन्यांना लावा. काही मिनिटांनंतर, मऊ ब्रशने घासून घ्या.
अर्धा कप पाण्यात एक चमचा अमोनिया मिसळा आणि त्यात दागिने बुडवून ठेवा.
मऊ ब्रशवर टूथपेस्ट लावा आणि दागिने हळूवारपणे घासून स्वच्छ करा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करुन चांदीचे दागिने स्वच्छ केल्याने ते चमकतात.
सोन्याचे दागिने बिअरमध्ये भिजवा, ते घासून पाण्याने धुवा, ते चमकतील.
चांदीचे दागिने अॅल्युमिनियम फॉइल आणि कोमट पाण्यात भिजवत ठेवा. यामुळे काळपटपणा दूर होईल.