Shreya Maskar
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज (19 मे) वाढदिवस आहे.
आज हा अभिनेता 51 वर्षांचा झाला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने 1999 साली रिलीज झालेल्या आमिर खानच्या 'सरफरोश' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी दोन वेळच्या जेवणासाठी कोथिंबीर विकायचा, तसेच त्याने चौकीदारची नोकरी देखील केली आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी मुंबईतील वर्सोवा येथे राहतो.
नवाजुद्दीन सिद्दीकीकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या लग्जरी कार आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी एका चित्रपटासाठी जवळपास 6-8 कोटी रुपयांचे मानधन घेतो.
मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीची संपत्ती जवळपास 160 कोटी रुपयांच्या वर आहे.