Siddhi Hande
आठवड्याभरातच नवरात्र सुरु होणार आहे. नवरात्रीत अनेकांचे ९ दिवस उपवास असतात.
नवरात्रीत तुम्ही नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा रताळे, बटाटा खाऊ शकत नाही.
त्यामुळे उपवासासाठी तुम्ही खास थालीपीठ किंवा भाकर बनवू शकतात. यासाठी तुम्हाला घरीच पीठ तयार करावे लागेल.
उपवासाचे पीठ बनवण्यासाठी तुम्हाला भगर, साबुदाणा आणि राजगिरा आवश्यक आहे.
सर्वात आधी तुम्ही भगर (वरई), साबुदाणा आणि राजगिरा भाजून घ्या. यानंतर हे सर्व पदार्थ थंड होऊ द्या.
त्यानंतर तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करु शकतात किंवा गिरणीवरूनदेखील दळून आणू शकतात.
हे पीठ तुम्ही हवाबंद डब्ब्यात भरुन ठेवा. हे पीठ ९ दिवस खराब होणार नाही.
या पीठापासून तुम्ही उपवासाचे थालीपीठ,भाकर, इडली, डोसा बनवू शकतात.