Shreya Maskar
९ दिवस ऑफिस, घर सांभाळून रात्री न थकता मनसोक्त गरबा खेळायचा असेल तर काही गोष्टींची विशेष काळजी घ्या.
नवरात्रीत बहुतेक लोक उपवास करतात. ज्यामुळे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. जे चुकीचे आहे.
उपवासातही पोटभर आणि पौष्टिक खा. जास्तीत जास्त पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.
योग्य आहार आणि पाण्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही राहाल आणि रात्री गरबा खेळताना थकणार नाही.
९ दिवस आपल्यातली नकारात्मकता विसरून सकारात्मक आणि आनंदी रहा.
नवरात्रीत जास्तीत जास्त फलाहाराकडे लक्ष द्या आणि वेळ मिळेल तसा आराम करा.
रोज मनोभावे देवीची पूजा आणि आराधना करा. जेणेकरून गरब्याला एक वेगळीच एनर्जी येईल.
वर्षभर आपण गरबा किंवा दांडिया खेळत नाही त्यामुळे एका दिवसात शरीर दुखू लागते. त्यामुळे नवरात्री सुरू होण्याआधी काही दिवस स्ट्रेचिंग, चालणे, सूर्यनमस्कार हे व्यायाम करा.