Shreya Maskar
नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस देवीच्या भक्तीत भक्त तल्लीन होतात.
देवीची मनोभावे आराधना करून पूजा करतात.
देवीची पूजा करताना ताटात कुंकू, हळद, अक्षता (तांदूळ), फुले, पानं, हार इत्यादी साहित्य असायला पाहिजे.
तसेच देवीची ओटी भरण्यासाठी खण-नारळाची ओटी, चुनरी, लाल-हिरवी काठापदराची साडी, वेणी ताटात ठेवा.
पूजेच्या ताटात न विसरता गोडाचा नैवेद्य ठेवा.
ओटीच्या ताटात साज श्रृंगारचे साहित्य असणे देखील महत्त्वाचे आहे. उदा. बांगड्या, मेंदी, काजळ, हार
पूजेच्या ताटात सुगंधित अगरबत्ती आणि मातीचा दिवा ठेवा.
सुपारी, कापसाच्या वाती देखील पूजेच्या ताटात असणे गरजेचे आहे.