Shreya Maskar
दसऱ्या आधी आवर्जून देवीची ओटी भरायला मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांना भेट द्या.
मुंबई शहराचे नाव मुंबा देवी वरून ठेवण्यात आले.
मुंबादेवी मंदिर आणि महालक्ष्मी मंदिर मुंबईकरांचे आराध्य दैवत आहे.
महालक्ष्मी स्टेशनला उतरून रिक्षाने आणि बसने तुम्हाला महालक्ष्मी मंदिरात जाता येते.
माहिम येथे शीतलादेवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
मुंबईतील दादर परिसरात भवानी शंकर रोडवर श्री कालिकामाता मंदिर आहे.
माटुंग्यात श्री सात आसरा मनमाला मंदिर आहे.
विरार येथील डोंगरमाथ्यावर प्रसिद्ध जीवदानी मंदिर वसलेले आहे.