Navratri Temples : आदिशक्तीचा महिमा अनुभवायचा आहे? नवरात्रीत आवर्जून दर्शन घ्या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे

Shreya Maskar

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे

नवरात्रीत देवीचा जागर केला जातो. महिला ही शक्तीचे, देवीचे आणि भक्तीचे रुप आहे. नवरात्रीत आवर्जून तुम्ही साडेतीन शक्ती पीठांना भेट द्या आणि मंगलमय वातावरण अनुभवा.

Navratri | pinterest

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर हे 'अंबाबाई' या नावानेही ओळखले जाते. धन, समृद्धी, सौभाग्य आणि ऐश्वर्य यांची देवता म्हणून महालक्ष्मीची आराधना केली जाते.

Shree Mahalakshmi Temple, Kolhapur | google

मंदिराची स्थापत्यकला

मंदिरातील दगडी बांधकाम, खांब आणि कोरीव नक्षीकाम पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात विशेष पूजा, धार्मिक विधी आणि उत्सवी वातावरण अनुभवायला मिळते.

Temple architecture | google

श्री तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर

छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदेवता म्हणून श्री तुळजाभवानी मंदिराची महती आहे. तुळजाभवानी देवीला दुर्गेचे शक्तिशाली रूप मानले जाते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची ती कुलदेवता आहे.

Sri Tuljabhavani Temple, Tuljapur | google

श्री रेणुकामाता मंदिर, माहूरगड

नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. डोंगराळ परिसरात वसलेले हे ठिकाण रेणुकामातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. रेणुकामातेला भगवान परशुरामांची माता म्हणून ओळखले जाते.

Sri Renukamata Temple, Mahurgarh | google

श्री सप्तशृंगी देवी मंदिर, वणी

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगड हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून सात पर्वतशिखरांच्या परिसरात देवीचे मंदिर वसलेले असल्यामुळे या ठिकाणाला सप्तशृंगी असे नाव पडले.

Sri Saptshringi Devi Temple, Vani | google

अर्धशक्तीपीठाचा मान

सप्तशृंगी देवीला दुर्गेचे एक शक्तिशाली रूप मानले जाते. देवीची अठरा हातांची भव्य मूर्ती हे मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे.महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांच्या परंपरेत सप्तशृंगी देवीला अर्ध्या पीठाचा मान दिला जातो.

Ardhashaktipetha neck | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : सह्याद्रीच्या कुशीतलं 'ढगांचं गाव'! ऑक्टोबरमध्ये उन्हाच्या कडाक्यात 'येथे' अनुभवाल थंडगार हवा

Maharashtra Hidden Gems | AI PHOTO
येथे क्लिक करा...