Shreya Maskar
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये गगनबावडा हे सुंदर ठिकाण वसलेले आहे. कडक उन्हाळ्यात तुम्हाला येथे थंडगार वातावरण अनुभवता येईल.
पावसाळ्यात धुक्याने झाकलेले डोंगर, असंख्य धबधबे, घनदाट हिरवाई आणि नागमोडी घाटरस्ते यामुळे गगनबावड्याचे सौंदर्य आणखीनं खुलते. निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे.
गगनबावड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणाहून दोन प्रसिद्ध घाटमार्ग वेगवेगळ्या दिशांना जातात. करूळ घाट कोकणातील तळेरे-कणकवलीच्या दिशेने जातो, तर भुईबावडा घाट खारेपाटण-राजापूरच्या दिशेने उतरतो.
गगनबावड्याजवळील गगनगड हा प्रमुख ऐतिहासिक आकर्षण आहे. गडाच्या परिसरात पायऱ्यांचा मार्ग असून तुलनेने कमी वेळात गडावर पोहोचता येते. गडावरून सह्याद्री आणि कोकणाच्या दिशेने सुंदर दृश्य दिसते.
गगनबावडा येथे गेल्यावर मोरजाई पठार, कोदे-कुंभी धरण परिसर, बावडेकर संग्रहालय, गगनबावडा व्हॅली व्ह्यू पाहायला नक्की जा.
पावसाळ्यात या भागात सर्वाधिक पाऊस पडतो, ज्यामुळे येथील डोंगररांगा धुक्याने वेढलेल्या हिरव्यागार नंदनवनात रूपांतरित होतात.
मुंबईहून कोल्हापूरपर्यंत रेल्वेने जाता येते. कोल्हापूरहून पुढे बस, कॅब किंवा स्वतःच्या वाहनाने गगनबावडा गाठता येतो. गगनबावडा ऑक्टोबरमध्ये फिरण्यासाठी बेस्ट आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.