Navratri Rings Designs : हातांच्या सौंदर्यात पडेल भर! घागरा चोळीवर खुलून दिसतील 'या' ७ स्टायलिश रिंग्स

Shreya Maskar

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर रिंग

गरबा लूकसाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीला प्राधान्य दिले जाते. ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर रिंग लूकची शोभा वाढवते. त्यावरील नक्षीकाम आणि पारंपरिक डिझाइन घागरा चोळी सुंदर दिसते.

Oxidized silver ring | pinterest

कुंदन स्टेटमेंट रिंग

रॉयल आणि आकर्षक लूक हवा असल्यास कुंदन रिंग निवडा. लाल, हिरवे, पांढरे खडे असलेली अंगठी हाताचे सौंदर्य वाढवते.

Kundan Statement Ring | pinterest

हाथफूल रिंग डिझाइन

अंगठी आणि हातातील ब्रेसलेट यांना साखळीने जोडणारे हाथफूल डिझाइन पारंपरिक लूकला खास बनवते. नवरात्री गरबा नाईटच्या लूकसाठी हे नक्की ट्राय करा.

Handful ring design | pinterest

मीनाकारी रिंग

रंगीत मीनाकारी काम असलेल्या अंगठ्या घागरा चोळीच्या रंगांशी सहज जुळवता येतात. गुलाबी, निळ्या, हिरव्या किंवा लाल रंगातील डिझाइन्समुळे तुमच्या हातांना आकर्षक लूक मिळतो.

Meenakari ring | pinterest

फ्लोरल रिंग

फुलांच्या आकारातील अंगठ्या नाजूक आणि आकर्षक दिसतात आणि आजकाल अशा अंगठ्या बाजारात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळता. हलक्या दागिन्यांसह गरबा खेळायचा असल्यास मध्यम आकाराची फ्लोरल रिंग निवडा.

Floral ring | pinterest

मिरर वर्क रिंग

मिरर वर्कचे दागिने गरबा लूकचे शोभा वाढवतात. घागरा चोळीसोबत लहान आरसे किंवा आरशासारखी सजावट असलेली अंगठी सुंदर दिसते.

Mirror work ring | pinterest

मोराच्या नक्षीची रिंग

आजकाल मोराची नक्षीकाम असलेले दागिने ट्रेंडींग आहेत. मोर, पानांची नक्षी किंवा पारंपरिक कोरीव काम असलेल्या अंगठ्या भारतीय संस्कृतीची झलक दाखवतात.

Peacock engraved ring | pinterest

मल्टी-फिंगर रिंग

दोन किंवा अधिक बोटांवर एकत्र दिसणारी मल्टी-फिंगर रिंग तुमच्या हातांना फॅशनेबल लूक देते.

Multi-finger ring | pinterest

NEXT : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Navratri Necklace Designs | AI PHOTO
येथे क्लिक करा...