Shreya Maskar
नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. दिवसभर उपवास करून रात्री रिकाम्या पोटी गरबा खेळल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात.
दिवसभर पुरेसे अन्न किंवा पाणी न घेतल्यास आणि त्यानंतर बराच वेळ गरबा खेळल्यास चक्कर येऊ शकते. शरीरातील पाण्याची कमतरता आणि रक्तदाब कमी होतो.
गरबा खेळताना शरीरातील स्नायूंना सतत ऊर्जा लागते. पुरेसे अन्न न खाल्ल्याने आणि दीर्घकाळ गरबा केल्याने थकवा, अशक्तपणा जाणवतो आणि भूक लागते.
इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणारी काही औषधे घेत असताना जर जेवण टाळले आणि शरीराची जास्त हालचाल केली तर रक्तातील साखर कमी होते. घाम येणे, हात थरथरणे, भूक लागणे, हृदयाचे ठोके वाढतात.
शारीरिक हालचाल, डिहायड्रेशन आणि रक्तातील साखर कमी होणे यांमुळे हृदयाचे ठोके वेगाने जाणवू शकतात. छातीत दुखणे, बेशुद्ध पडणे, श्वास घेण्यास त्रास होतो.
दीर्घकाळ गरबा केल्याने पायांच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो. थकवा, घामामुळे द्रवपदार्थ कमी होणे आणि इतर घटकांमुळे स्नायू दुखणे किंवा गोळे येणे शक्य आहे.
सतत नृत्य केल्याने घाम येतो. त्यातून कमी झालेले पाणी भरून काढले नाही, तर डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे, थकवा, गडद पिवळी लघवी आणि चक्कर येते.
वरील माहती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.