Shreya Maskar
नवरात्री हा देवी दुर्गेच्या उपासनेचा पवित्र सण आहे. या नऊ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा केली जाते. देवीला वेगवेगळा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
देवी शैलपुत्री - या दिवशी देवीला शुद्ध गाईच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
देवी ब्रह्मचारिणी - देवीला साखर, खडीसाखर किंवा फळे अर्पण करण्याची प्रथा आहे.
देवी चंद्रघंटा - दूध किंवा दुधापासून तयार केलेली खीर देवीला अर्पण करू शकता.
देवी कुष्मांडा - या दिवशी मालपुआ किंवा इतर गोड पदार्थ अर्पण करण्याची परंपरा आहे.
देवी स्कंदमाता - देवीला केळी अर्पण केली जातात. फळांचा नैवेद्य हा साधा आणि सहज उपलब्ध पर्याय आहे.
देवी कात्यायनी - या दिवशी देवीला मध अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे.
देवी कालरात्री - देवीला गूळ किंवा गुळापासून तयार केलेला गोड पदार्थ अर्पण करू शकता.
देवी महागौरी - नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी या दिवशी कन्या पूजनही केले जाते.
देवी सिद्धिदात्री - तीळ किंवा तिळापासून तयार केलेला पदार्थ अर्पण करण्याची प्रथा काही परंपरांमध्ये आढळते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.