Shreya Maskar
नाशिकजवळ महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रसिद्ध असलेले सप्तशृंगी देवी मंदिर आहे.
मुंबा देवी मंदिर मुंबईकरांसाठी प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे.
लोणावळ्याजवळ कार्ला लेण्यांच्या जवळ एका टेकडीवर एकवीरा देवी मंदिर आहे.
माहूर येथील रेणुका देवी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे.
सोलापूरजवळ तुळजापूर शहरात तुळजा भवानीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.
चतु:शृंगी मंदिर पुणे शहरातील प्रसिद्ध मंदिर आहे.
मुंबईजवळील वज्रेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.