Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये नवरात्री हा सण हा अत्यंत पवित्र आणि शुभ सण मानला जातो.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि अनेक भाविक उपवासाचेे व्रत करतात.
नवरात्रात उपवासाला कांदा- लसूणचे सेवन करावे की नाही? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
धार्मिक शास्त्रानुसार, नवरात्रीच्या उपवासात कांदा आणि लसूण खाण्यास पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. उपवासाच्या काळात फक्त सात्विक आहार केला जातो.
आयुर्वेदानुसार, कांदा आणि लसूण हे 'तामसिक' असतात. यामुळे शरीरात आणि मनात आळस, क्रोध, कामवासना आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते त्यामुळे नवरात्रीत उपवासाला कांदा - लसूण खाणे टाळले जाते.
कांदा आणि लसूण खाल्ल्यामुळे शरीराचे तापमान आणि उष्णता वाढू शकते. त्यामुळे उष्ण पदार्थ टाळावे.
उपवासाच्या काळात मन शांत आणि पवित्र ठेवण्यासाठी सात्विक भोजन जसे की फळे, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ, पाण्याचा आहार घेतला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.