Shreya Maskar
नवरात्रीच्या उपवासासाठी काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि पोटभर खायचे असेल, तर शिंगाड्याच्या पिठाची पुरी नक्की ट्राय करा.
शिंगाडा पिठाची कुरकुरीत पुरी बनवण्यासाठी शिंगाड्याचे पीठ, उकडलेला बटाटा, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, पाणी आणि तेल इत्यादी साहित्य लागते.
शिंगाडा पिठाची पुरी बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये शिंगाड्याचे पीठ, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे आणि सैंधव मीठ घालून एकत्र करा. गरजेनुसार थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळा.
पिठाचे छोटे गोळे करून ओल्या हातांनी हलक्या हाताने गोल पुऱ्या थापा. शिंगाड्याचे पीठ ठिसूळ असल्याने पुऱ्या फार पातळ करू नका.
पॅनमध्ये तेल गरम करून पुऱ्या मध्यम आचेवर तळून घ्या. हलक्या हाताने दाब देत फुलवून घ्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळा.
तयार पुऱ्या टिश्यू पेपरवर काढा. उपवासाच्या बटाट्याची भाजी, दही किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबत सर्व्ह करा.
पीठ मळताना जास्त पाणी घालू नका कारण पीठ घट्ट असावे. पुऱ्या थापताना हाताला थोडे पाणी लावा, म्हणजे पीठ कमी चिकटेल.
तेल पुरेसे गरम झाल्यावरच पुरी तळा, खूप थंड तेलात पुरी तेलकट होऊ शकते. उकडलेला बटाटा घातल्याने पीठ एकत्र बांधण्यास मदत होते आणि पुऱ्या लाटणे सोपे जाते.