Rajgira Laddu Recipe : नवरात्रीत उपवासाला खा टेस्टी राजगिरा लाडू; प्रोटीनसह मिळेल दिवसभराची एनर्जी, रेसिपी १० मिनिटांत तयार

Shreya Maskar

राजगिरा लाडू

राजगिरा लाडू बनवण्यासाठी राजगिरा लाह्या, गूळ, तूप, वेलची पूड, काजू/बदाम आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Rajgira Laddu | pinterest

राजगिरा भाजा

राजगिरा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम राजगिरा लाह्या स्वच्छ करून घ्या. त्या आधीच कुरकुरीत असतील तर थोड्या वेळासाठी मंद आचेवर कोरड्या भाजून घ्या. जास्त भाजू नका.

Roasting the Rajgira | pinterest

गुळाचा पाक

कढईमध्ये गूळ आणि 2-3 चमचे पाणी घालून मंद आचेवर गूळ वितळू द्या. गूळ पूर्ण वितळल्यानंतर पाकाला उकळी येऊ द्या. थोडासा पाक पाण्यात टाकल्यावर तो घट्ट गोळा बनला, तर पाक योग्य झाला असे समजावे. पाक खूप पातळ राहिल्यास लाडू बांधताना अडचण येऊ शकते.

Jaggery Syrup | pinterest

मिश्रण एकत्र करा

गॅस बंद करून लगेच राजगिरा लाह्या, वेलची पूड आणि चिरलेले ड्रायफ्रूट घाला. सर्व साहित्य पाकामध्ये व्यवस्थित मिसळा. हाताला थोडे तूप लावून मिश्रण गरम असतानाच छोटे-छोटे भाग घेऊन घट्ट लाडू वळा. मिश्रण थंड झाल्यावर ते बांधणे कठीण होते.

Mixing the Ingredients | pinterest

किती दिवस टिकतात?

राजगिरा लाडू हवाबंद डब्यात ठेवा. साधारणपणे १-२ आठवडे लाडू ताजे राहतात. डबा ओलाव्यापासून दूर ठेवा. तसेच कडक उन्हात ठेवू नका.

Shelf Life | pinterest

किती लाडू खावेत?

राजगिरा लाडू पौष्टिक असले तरी त्यात गूळ आणि तुपामुळे कॅलरीयुक्त असतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशीही फक्त १-२ लाडू खाणे हेल्दी ठरते.

ladoos | pinterest

लाडू परफेक्ट होण्यासाठी टिप्स

पाक खूप पातळ ठेवू नका, अन्यथा लाडू सैल होऊ शकतात. जास्त गूळ घातल्यास लाडू खूप चिकट होऊ शकतात. लाडू वळताना मिश्रण पूर्ण थंड होऊ देऊ नका.

Tips for making perfect ladoos | pinterest

उपवासात राजगिरा का?

राजगिर्यामध्ये प्रथिने, फायबर आणि अनेक खनिजे असतात, उपवासात हे खाणे फायदेशीर ठरते. मात्र लाडूमध्ये गूळ असल्याने ते गोड पदार्थ आहेत, त्यामुळे मधुमेह किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्याची गरज असलेल्या व्यक्तींनी लाडू खाताना प्रमाणाची काळजी घ्यावी.

Why Rajgira during fasting? | pinterest

NEXT : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

Dahi Kadhi Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...