Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसांवर नऊरात्री हा सण येणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नऊरात्रीचा उत्साह पाहायला मिळतो. नऊरात्री या सणाला खास महिला, मुली पारंपारिक पोशाख करतात.
नऊरात्रीनिमित्त तुम्हीही गरब्यासाठी सुंदर लूक करणार असाल तर 7 प्रकारचे ऑक्सिडाइज्ड दागिने तुमच्याकडे असणे महत्वाचे आहे.
नवरात्रीच्या पारंपरिक लूकसाठी एक भरजरी किंवा स्टेटमेंट चोकर सेट सुंदर दिसतो. काळ्या किंवा गडद रंगाच्या चनिया चोलीवर हा सेट तुम्ही घालू शकता.
कानात घालण्यासाठी मोठे झुमके, ऑक्सिडाइज्ड चांदबाली किंवा घुंगरू असलेले लांब इयररिंग्स तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य द्विगुणित करतात. गरबा खेळताना हलणाऱ्या घुंगरांचा आवाज या फेस्टिव्हलची रंगत आणखी वाढवतो.
हातामध्ये काचेच्या बांगड्यांसोबत एक किंवा दोन मोठे ऑक्सिडाइज्ड कडे किंवा जाड बांगड्या घातल्यास मनगटाचा लूक खूपच स्टायलिश आणि ट्रेंडी वाटतो.
जर तुम्हाला थोडा वेगळा आणि पारंपरिक लूक हवा असेल, तर ऑक्सिडाइज्ड नथ नक्की ट्राय करा. यामुळे चेहऱ्याचा लूक पूर्णपणे बदलून जातो आणि खूप सुंदर फोटोंसाठी हा लूक बेस्ट ठरतो.
चनिया चोली किंवा साडीवर ऑक्सिडाइज्ड कंबरपट्टा लावल्याने शरीराला एक सुंदर आकार मिळतो आणि संपूर्ण गरबा आऊटफिट खूपच आकर्षक व रिच दिसू लागतो.
पायात घालण्यासाठी घुंगरांचे ऑक्सिडाइज्ड पैंजण आणि डिझायनर जोडवी या सणाला एक पारंपरिक आणि क्लासिक लुक देतात, जे पायांचे सौंदर्य वाढवतात.