Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Shreya Maskar

ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर झुमके

गरबा लूकसाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी हा लोकप्रिय पर्याय आहे. मोठे गोल, झुलणारे ऑक्सिडाइज्ड झुमके घागरा-चोळीसोबत सुंदर दिसतात. विशेषतः रंगीत किंवा मिरर वर्क असलेल्या पोशाखावर झुमके उठून दिसतात.

Oxidized silver earrings | pinterest

मिरर वर्क झुमके

घागरा-चोळीवर मिरर किंवा शीशा वर्क असेल तर त्याच थीमचे झुमके लूक सुंदर दिसतो. छोट्या आरशांचे किंवा रंगीत मिररचे काम असलेले झुमके गरबा नाईटसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात.

Mirror work earrings | pinterest

झुमका स्टाइल

क्लासिक झुमका कधीही आउट ऑफ स्टाइल होत नाही. पारंपरिक गोल झुमक्यांपासून मोत्यांच्या, छोट्या घंट्यांच्या डिझाइन्सपर्यंत अनेक पर्याय मिळतात. साडी, लहंगा किंवा घागरा-चोळीसोबत हे सहज जुळतात.

Jhumka style | pinterest

ऑक्सिडाइज्ड चांदबाली

चांदबाली आणि गरबा लूक हे एक आकर्षक कॉम्बिनेशन ठरू शकते. मोठ्या आकाराच्या चांदबाली चेहऱ्याला उठाव देतात. मात्र झुमके खूप मोठे असल्यास इतर ज्वेलरी साधी ठेवली तर लूक सुंदर दिसतो.

Oxidized Chandbali | pinterest

कुंदन- पोल्की स्टाइल झुमके

जर तुम्हाला पारंपरिक आणि रॉयल लूक हवा असेल तर कुंदन किंवा पोल्की पॅटर्नचे झुमके निवडता येतील. हे जड दिसत असल्यामुळे अशा झुमक्यांसोबत नेकलेस किंवा चोकर हलका ठेवणे चांगले.

Kundan- Polki style earrings | pinterest

ट्रेडिशनल गुजराती डिझाइन झुमके

गरबा हा गुजराती संस्कृतीशी जोडलेला नृत्यप्रकार असल्याने पारंपरिक गुजराती मोटिफ, रंगीत मणी, घंट्या किंवा हस्तकलेच्या डिझाइनचे झुमके घागरा-चोळीसोबत विशेष उठून दिसतात.

Traditional Gujarati Design Jhumkas | pinterest

मिरर आणि टॅसल झुमके

मिररसोबत लटकणारे टॅसल किंवा धाग्यांचे काम असलेले झुमके गरबा पोशाखाला फेस्टिव्ह लूक देतात. हे विशेषतः हलक्या वजनाच्या ज्वेलरीला प्राधान्य देणाऱ्यांसाठी पर्याय ठरू शकतात.

Mirror and tassel earrings | pinterest

रंगीत बीड्सचे झुमके

लाल, निळा, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी अशा रंगांचे बीड्स असलेले झुमके साध्या आउटफिटमध्येही रंग भरू शकतात. तुमच्या घागरा-चोळीतील एखादा प्रमुख रंग झुमक्यांमध्ये रिपीट केल्यास लूक अधिक कोऑर्डिनेटेड दिसतो.

Earrings of colored beads | pinterest

NEXT : गरब्यासाठी स्टायलिश घागरा-चोळीच्या ७ लेटेस्ट डिझाइन्स, नवरात्रीआधी करा शॉपिंग

Ghagra-choli Designs | AI PHOTO
येथे क्लिक करा...