ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नवरात्रीमध्ये देवी मातेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.देवी मातेच्या नऊ रुपांना नव दुर्गा म्हणतात.
नवरात्र उत्सवातील देवी मातेचे पहिले रुप शैलपुत्री आहे. शैली म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या होय.
ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्याने आपल्यामध्ये चांगले गुण येऊ लागतात.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवी मनाच्या आकर्षकतेचे प्रतिक आहे.
नवरात्रीतील कुष्मांडा देवीचा अर्थ म्हणजे कोहळ आहे. कुष्मांडा देवी प्रत्येकाला ऊर्जा देण्याचे काम करत असते.
नवरात्रीतील स्कंदमाता देवी ही कार्तिकेयाची माता आहे. या देवीची आराधना केल्याने आपल्या कौशल्यात निरागसपणाचा गुण येतो.
कात्यायनी देवी मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारी आहे. कुमारिका नवरात्रीच्या दिवसात चांगला वर मिळण्यासाठी कात्यायनी देवीची पूजा करतात.
नवरात्रीतील कालरात्री देवीचा अर्थ म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती आहे.
महागौरी देवी भाविकांना जीवनाबाबतचे ज्ञान प्रदान करत असते.
नवरात्रीतील शेवटची देवी सिद्धिदात्री सर्वांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करत असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
NEXT: लहान मुलांसाठी १५ मिनिटांत बनवा चटपटीत फ्रँकी