Panvel Fort : चार राजवटींच्या सत्तांतराचा साक्षीदार आहे नवी मुंबईतील 'हा' किल्ला

Shreya Maskar

ऐतिहासिक ट्रिप

नेहमी नेहमी पिकनिक स्पॉट्सना भेट देण्यापेक्षा मुंबईजवळ असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांचीही सफर करा, यामुळे तुम्हाला पुन्हा इतिहासाची उजळणी करता येईल.

A historical trip | google

नवी मुंबई

बेलापूर किल्ला हा नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूरमध्ये, उरण रोड आणि पाम बीच रोडजवळ वसलेला आहे. मुंबईजवळील हे खूप कमी लोकांना माहीत असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे.

Navi Mumbai | google

बेलापूर किल्ला

बेलापूर किल्ला हा १६ व्या शतकातील एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. पनवेल आणि पुण्याकडे जाणाऱ्या सागरी आणि जमिनीवरील मार्गांवर नियंत्रण ठेवणारे हे एक महत्त्वाचे मोक्याचे निरीक्षण केंद्र होते.

Belapur Fort | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

बेलापूर किल्ल्याची सत्ता चार प्रमुख प्रादेशिक शक्तींच्या सिद्दी, पोर्तुगीज, मराठे आणि ब्रिटिश हातात बदलत राहिली.

Features of the fort | google

किल्ला कोणी बांधला?

१६ व्या शतकात जंजिऱ्याच्या सिद्दींनी हा किल्ला बांधला होता. त्यानंतर पोर्तुगीजांनी तो जिंकून आपल्या ताब्यात घेतला, पुढे मराठ्यांनी तो पुन्हा हस्तगत केला आणि अखेरीस ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तो आपल्या ताब्यात घेतला.

Who built the fort? | google

किल्ल्याच्या नावाचा इतिहास

असे बोले जाते की, १७३३ मध्ये जेव्हा मराठा सेनापती चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगीजांकडून हा किल्ला पुन्हा जिंकला, तेव्हा त्यांनी जवळच्या एका मंदिरात बेलच्या पानांची माळ अर्पण करून आपला धार्मिक नवस पूर्ण केला. या घटनेमुळे या ठिकाणाचे नाव 'बेलापूर किल्ला' असे पडले.

History of the name of the fort | google

कसं जाल?

पनवेल ट्रेन पकडून बेलापूरला उतरा. तेथून पुढे रिक्षाने तुम्ही बेलापूर किल्ल्यापर्यंत पोहचू शकता. वाटेत तुम्हाला निसर्गाचे सुंदर रुप पाहायला मिळेल.

how do you go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Alibag Fort | AI PHOTO
येथे क्लिक करा...