Shreya Maskar
तुम्ही वीकेंड ट्रिप प्लान करत असाल तर गडेश्वर धरण हे बेस्ट लोकेशन आहे. पावसाळ्यात येथे हिरवागार निसर्ग खुलून येतो.
गडेश्वर धरण हे रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील शांत, निसर्गरम्य धरण आहे. तुम्ही येणाऱ्या वीकेंडला गडेश्वर धरण येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.
गडेश्वर धरणच्या परिसरातून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तसेच हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करण्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही येथे रोड ट्रिप देखील प्लान करू शकता.
पनवेल रेल्वे स्थानकापासून अंदाजे ७ किमी अंतरावर गडेश्वर धरण आहे. तुम्ही स्टेशनला उतरल्यावर रिक्षाने प्रवास करून गडेश्वर धरणापर्यंत जा.
गाडेश्वर धरण हे कॅम्पिंगसाठी एक लोकप्रिय आणि शांत ठिकाण आहे. हे ठिकाण तिथल्या हिरव्यागार टेकड्या, धरणाचा विस्तीर्ण जलाशयासाठी(बॅकवॉटर) प्रसिद्ध आहे.
गाडेश्वर धरण माथेरानच्या निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेले आहे. पक्षी-निरीक्षणाचा येथे आनंद घेता येतो. शहराच्या गोंधळातून तुम्हाला येथे शांती मिळेल.
'पनवेल'जवळ कर्नाळा पक्षी अभयारण्य, कलावंतीण दुर्ग, प्रबळगड किल्ला हे सुंदर पिकनिक स्पॉट्स आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.