Shreya Maskar
गगनबावडा हे कोल्हापूरपासून ५५ किमी अंतरावर, पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले हिल स्टेशन आहे. पावसाळ्यात येथील निसर्ग बहरतो.
वैभववाडी भागात सुंदर नापणे धबधबा वसलेला आहे, जो जवळपास वर्षभर वाहता असतो. दाट झाडी असलेल्या दरीत वसलेला नापणे धबधबा खूप शांत आणि निसर्गरम्य आहे.
तुम्हाला हायकिंगची आवड असेल तर मोरजाई पठाराला भेट द्या. जांभ्या दगडाचे (लॅटेराईट) हे पठार पावसाळ्यात रानफुले आणि धुक्याने व्यापते. येथे तुम्हाला देवी मोरजाईचे हे गुहा-मंदिर पाहायला मिळेल.
राधानगरी धरणाच्या जलाशयाजवळ (बॅकवॉटर) दाजीपूर अभयारण्य आहे. हे ठिकाण 'इंडियन बायसन' (गवा) पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.
करुळ घाट हा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेतील एक निसर्गरम्य घाट-मार्ग आहे, जो महाराष्ट्रातील दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीशी जोडतो. हा घाट येथील चित्तथरारक प्रवास, नागमोडी वळणे, दाट हिरवळ आणि पावसाळ्यातील अप्रतिम धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.
भुईबावडा अतिशय सुंदर घाट-मार्ग आहे जो दख्खनच्या पठाराला (कोल्हापूर) कोकण किनारपट्टीशी जोडतो. तुम्ही येथे रोड ट्रिप प्लान करू शकता.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात असलेले पालसंबे हे गाव येथील प्राचीन 'रामलिंग मोनोलिथिक रॉक-कट मंदिर' (जे 'पांडवलेणी' म्हणूनही ओळखले जाते) यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.