Navi Mumbai Flamingo: नवी मुंबईत हजारो परदेशी पाहुणे दाखल, फ्लेमिंगो कुठे पाहाल?

Siddhi Hande

नवी मुंबई

नवी मुंबईत अखेर फ्लेमिंगोंचे आगमन झाले आहे. पक्षीप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

Navi Mumbai Flamingo

फ्लेमिंगोंचा थवा

एनआरआय आणि टी.एस. चाणक्य Indian Maritime University परिसरातील पाणथळ भागात फ्लेमिंगोंचा थवा पाहायला मिळाला.

Navi Mumbai Flamingo

फ्लेमिंगो

यंदा फ्लेमिंगोंचे आगमन थोडे उशिराने झाले आहे. मार्च महिन्यातच फ्लेमिंगो पाहायला मिळतात.

Navi Mumbai Flamingo

जैवविविधतेचे आकर्षण

फ्लेमिंगो पक्षीच्या आगमनाने नवी मुंबई परिसरात पुन्हा एकदा जैवविविधतेचे आकर्षक दृश्य निर्माण झाले आहे.

Navi Mumbai Flamingo

पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी

दरवर्षीप्रमाणे यंदाही हे स्थलांतरित पक्षी काही काळ नवी मुंबईत वास्तव्यास राहणार आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

Navi Mumbai Flamingo

नैसर्गिक अधिवास

फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे नवी मुंबईतील पाणथळ भागांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित झाले आहे. या नैसर्गिक अधिवासाच्या संवर्धनाची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे.

Navi Mumbai Flamingo

नवी मुंबई परिसर

ठाणे- नवी मुंबई- पनवेल या परिसरात खाडीकिनाऱ्यावर फ्लेमिंगो पक्षी पाहायला मिळतात. मे महिन्यापर्यंत हे पक्षी भारतात राहतील.

Navi Mumbai Flamingo

वेगवेगळ्या जातीचे पक्षी

वेगवेगळ्या जातीचे फ्लेमिंगो पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. अनेक पर्यटक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करतात.

Navi Mumbai Flamingo

पाम बीच

नवी मुंबईतील पाम बीचजवळदेखील तुम्हाला प्लेमिंगोचे दर्शन घेता येणार आहे. तुम्ही इथे जाऊनदेखील फ्लेमिंगो पाहू शकता.

Navi Mumbai Flamingo

Next: पराक्रम, त्याग अन् अभिमानाचे प्रतीक, ‘हे’ ठिकाण भारताच्या सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक

Chittorgarh Fort | yandex
येथे क्लिक करा