Panvel Tourism : हिरवीगार डोंगररांग अन् कोसळणारे धबधबे; पनवेलचा पाऊस अनुभवायलाच हवा, नक्की फिरा 'ही' ठिकाणं

Shreya Maskar

अभयारण्य-किल्ला

पनवेलजवळी कर्नाळा पक्षी अभयारण्यात ऐतिहासिक किल्ला देखील वसलेला आहे. अनेक रंगीबेरंगी पक्षी येथे पाहायला मिळतात. हिरवेगार जंगलाने हे ठिकाण वेढलेले आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा प्लान करा.

Sanctuary-Fort | google

गाडेश्वर तलाव

गाडेश्वर तलाव हे लहान टेकड्यांनी वेढलेले आहे. पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर येथे नक्की फेरफटा मारायला जा.

Gadeshwar Lake | google

खारघर हिल्स

पावसाळ्यात तुम्हाला स्वर्गाहून सुंदर ठिकाण पाहायचे असेल तर खारघर हिल्स बेस्ट लोकेशन राहील. निसर्गरम्य दृश्ये पाहण्यासाठी आणि मोकळ्या हवेत फिरण्यासाठी येथे परदेशी पर्यटकही येतात.

Kharghar Hills | google

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्ग येथे ट्रेकिंगचा थरार अनुभवता येतो. खडकात कोरलेला एक प्रसिद्ध आणि अतिशय चढणीचा किल्ला. साहसी पर्यकांसाठी येथे चढाईचा रोमांचक अनुभव मिळतो.

Kalawantin Durg | google

प्रबळगड किल्ला

प्रबळगड किल्ला हा कलावंतीण दुर्गाच्या शेजारी असलेला ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. ट्रेकर्सना येथून पश्चिम घाटाची विहंगम दृश्ये पाहायला मिळतात.

Prabalgad Fort | google

चंदेरी किल्ला

चंदेरी किल्ल्यावरून इर्शाळगड आणि कर्नाळा यांसारख्या जवळच्या शिखरांची विहंगम दृश्ये दिसतात. वीकेंडला येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Chanderi Fort | google

अडाई धबधबा

पावसाळ्यात अडाई धबधब्यावर धुक्याची चादर पाहायला मिळते. हे ठिकाण घनदाट जंगलाने वेढलेले आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.

Adai Falls | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : जंगल ट्रेक अन् फेसाळलेला धबधबा, पावसाळ्यात वीकेंडसाठी बेस्ट डेस्टिनेशन

Kolhapur Tourism | google
येथे क्लिक करा...