Shreya Maskar
नवरात्रीत मनसोक्त गरबा खेळण्याचा आनंद तर आपण घेतो, मात्र त्यानंतर पाय दुखू लागतात आणि वेदना असह्य होतात.
गरबा खेळताना सतत नाचणे, उड्या मारणे आणि बराच वेळ उभे राहिल्यामुळे पाय, टाचा आणि पोटऱ्यांमध्ये वेदना जाणवू शकतात, त्यामुळे घरी आल्यावर हे उपाय करा २-३ मिनिटांत पायांना आराम मिळेल.
गरबा खेळल्यानंतर काही वेळ आराम करा. वेदना असताना जास्त चालणे, व्यायाम करणे टाळा. पायांना योग्य आधार मिळेल असे फुटवेअर वापरा. अनवाणी चालणे टाळा.
पायाला सूज किंवा दुखापत असल्यास बर्फाने १५–२० मिनिटे शेक घ्या. बर्फ थेट त्वचेवर ठेवू नका. सूज किंवा ताजी दुखापत नसल्यास कोमट पाण्याने शेक घेतल्याने स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते. त्यामुळे नियमित पाणी प्या. वेदना कमी झाल्यानंतर पोटऱ्यांचे हलके स्ट्रेचिंग करा. वेदना वाढल्यास लगेच थांबा.
झोपताना पायाखाली उशी ठेवल्याने सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच झोपताना सरळ झोपायला ट्राय करा.
पायावर वजन ठेवता येत नसेल. तीव्र वेदना किंवा जास्त सूज असेल आणि पायाच्या पोटरीत वेदनेसह सूज, लालसरपणा किंवा उष्णता जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांकडे जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.