Nauvari Saree Design: सण, लग्न किंवा खास कार्यक्रमासाठी ट्राय करा 'या' ७ सुंदर नऊवारी साड्या; खुलून दिसेल मराठमोळा लूक

Shruti Vilas Kadam

पैठणी नऊवारी साडी

पैठणीच्या पारंपरिक विणकामाला नऊवारी स्टाइलची जोड दिल्यास अतिशय रॉयल लूक मिळतो. मोर, कमळ किंवा पारंपरिक बुट्ट्यांची डिझाइन असलेली पैठणी नऊवारी खास दिसते.

Nauvari Saree Draping | Saam Tv

जरी काठाची नऊवारी

सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा रुंद काठ असलेली नऊवारी साडी सण आणि लग्नासाठी उत्तम पर्याय आहे. पारंपरिक दागिन्यांसोबत हा लूक अधिक उठून दिसतो.

Nauvari Saree Draping | pinterest

कॉटन नऊवारी

दैनंदिन वापरासाठी किंवा हलक्या पारंपरिक कार्यक्रमांसाठी कॉटन नऊवारी निवडू शकता. ही साडी आरामदायी असून साधेपणातही आकर्षक मराठमोळा लूक देते.

Nauvari Saree For Bride

सिल्क नऊवारी

सिल्क फॅब्रिकची नऊवारी साडी दिसायला सुंदर आणि एलिगंट असते. लग्न, साखरपुडा किंवा मोठ्या कौटुंबिक समारंभासाठी गडद रंगातील सिल्क नऊवारी ट्राय करता येते.

The Nauvari Saree | pinterest

कलरफुल नऊवारी

लाल, हिरवा, जांभळा, निळा किंवा गुलाबी यांसारख्या आकर्षक रंगांतील नऊवारी साडी पारंपरिक लूकमध्ये फ्रेशनेस आणते. कॉन्ट्रास्ट ब्लाउजसोबत ती आणखी सुंदर दिसते.

Nauvari saree Look

बॉर्डर आणि बुट्ट्यांची नऊवारी

सुंदर बॉर्डर आणि संपूर्ण साडीवर छोटे पारंपरिक बुट्टे असलेली नऊवारी साडी साधी असूनही उठावदार दिसते. नथ, ठुशी आणि पारंपरिक दागिन्यांसोबत हा लूक खुलतो.

The Nauvari Saree | pinterest

मॉडर्न नऊवारी डिझाइन

पारंपरिक नऊवारीमध्ये आधुनिक रंगसंगती, हलके फॅब्रिक किंवा वेगळ्या प्रिंट्सचा वापर केलेल्या साड्या सध्या तरुणींना आवडतात. पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मेळ साधता येतो.

Nauvari saree Look

Nath Design: सणासुदीला मराठमोळ्या लूकसाठी 'या' ७ नथ नक्की ट्राय करा; नऊवारी, साडी आणि ड्रेसवर दिसाल सुंदर

Nath Design | Saam Tv
येथे क्लिक करा