Shruti Vilas Kadam
मोत्यांची नाजूक मांडणी आणि सोन्याचा पारंपरिक टच असलेली ब्राह्मणी नथ साडी किंवा पैठणीसोबत सुंदर दिसते. सण-समारंभासाठी हा क्लासिक पर्याय ठरू शकतो.
मोत्यांनी सजवलेली नथ साधी, एलिगंट आणि आकर्षक दिसते. हलक्या रंगाच्या साडीपासून ते पारंपरिक सिल्क साडीपर्यंत विविध लूकसोबत ती सहज मॅच करता येते.
पेशवाई नथीमध्ये पारंपरिक दागिन्यांची झलक पाहायला मिळते. सोन्याचा वापर, मोती आणि रंगीत खडे यामुळे ही नथ लग्न किंवा मोठ्या समारंभासाठी खास दिसते.
ठुशीच्या डिझाइनपासून प्रेरित नथ पारंपरिक आणि रॉयल लूक देते. ठुशी किंवा कोल्हापुरी साजासोबत अशी नथ घातल्यास मराठमोळा लूक अधिक खुलतो.
रंगीत खडे किंवा कुंदन वर्क असलेली नथ पारंपरिक लूकमध्ये थोडा ग्लॅमरस टच देते. लग्नसमारंभ किंवा रिसेप्शनसाठी हा पर्याय निवडता येतो.
ज्यांना मोठी नथ आवडत नाही त्यांच्यासाठी छोट्या आकाराची मिनिमल नथ उत्तम पर्याय आहे. ऑफिसमधील पारंपरिक कार्यक्रम किंवा छोट्या समारंभासाठी ती योग्य ठरू शकते.
ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर नथ इंडो-वेस्टर्न किंवा बोहो लूकसाठी ट्राय करू शकता. कॉटन साडी, पैठणी किंवा एथनिक ड्रेससोबत ही नथ हटके दिसते.