Shreya Maskar
सणासुदीला, लग्न समारंभात आपण नऊवारी साडी नेसतो. नऊवारी साडीत तुम्हाला रुबाबदार दिसायचे असेल तर ब्लाउजची योग्य पॅटर्न निवडा. तुमचा लूक खुलून येईल.
नऊवारी साडीवर एकदम पारंपरिक लूक हवा असेल तर खणाचे ब्लाउज आवर्जून घाला. यात तुम्हाला विविध रंगाचे कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळेल.
नऊवारी साडीचे ब्लाउज बंद गळ्याचे असावे आणि ब्लाउजच्या स्लीव्ह कोपऱ्यापर्यंत असावेत. फुल स्लीव्ह आणि हाफ स्लीव्ह वेलवेट ब्लाउज शिवा.
नऊवारी साडीवर लाल-हिरवा, निळा-पिवळा, गुलाबी-हिरवा हे कॉम्बिनेशन सुंदर दिसतात. तसेच तुम्ही मरून, सोनेरी, गडद निळा हे रंग देखील वापरू शकता.
झरी आणि भरतकाम असलेले सिल्क ब्लाउज, कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज नऊवारी साडीवर सुंदर दिसतात. असे ब्लाउज तुम्हाला ऑनलाइन सहज उपलब्ध मिळतील.
ब्लाउज नेकलाइनसाठी बोट नेक, स्वीटहार्ट कट किंवा हॉल्टर नेक स्टाइल यांची निवडता येतात. तुम्ही साडीला मॅचिंग असा ब्लाउज निवडा.
नऊवारी साडीवर ब्लाउज शिवताना तुम्ही कॉटन, शिफॉन, रेशीम यांसारखे फॅब्रिक वापरू शकता. हे कापड तुमच्या नऊवारी साडीची शोभा वाढवेल.
तुमची नऊवारी साडी थोडी प्लेन असेल तर तुम्ही भरजरी ब्लाउज शिवा. लग्नात तुम्हीच शोभून दिसाल आणि तुमचा लूक रॉयल आणि पारंपरिक दिसेल.