Shreya Maskar
डोळ्यांसाठी काजळ हा मेकअपचा महत्त्वाचा भाग आहे. बाजारातील केमिकलयुक्त काजळ वापरण्यापेक्षा घरीच सिंपल पद्धतीने काजळ बनवा. पद्धत आताच नोट करा.
घरगुती काजळ बनवण्यासाठी कापसाची वात, शुद्ध तूप, एरंडेल तेल, माती किंवा तांब्याचा दिवा आणि एक प्लेट आवश्यक आहे.
दिव्यात तूप घाला, वात पेटवा आणि आगीवर उलटी प्लेट ठेवा. १० ते १५ मिनिटांत प्लेटच्या तळाशी काळी काजळ जमा होईल. हे खरे काजळ आहे.
तयार काजळ स्वच्छ चमच्याने गोळा करा आणि त्यात १-२ थेंब तूप किंवा एरंडेल तेल मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. काजळ स्वच्छ, हवाबंद डब्यात साठवता येते.
घरगुती काजळ पूर्णपणे रसायनमुक्त आहे, त्यामुळे डोळ्यांना जळजळ किंवा अॅलर्जी होत नाही. त्यात असलेले तूप किंवा तेल डोळ्यांना मॉइश्चरायझ करते, कोरडेपणा कमी करते.
योग्य प्रमाणात एरंडेल तेल घातल्याने काजळ नैसर्गिकरित्या वॉटरप्रुफ आहे. तसेच डागांपासून सुरक्षित ठेवते. तुम्ही घरगुती काजळाची देखील एक पॅच टेस्ट करा आणि मगच डोळ्यांना लावा.
घरगुती काजळ नेहमी स्वच्छ बोटाने किंवा ब्रशने लावा. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डोळ्यांचा संसर्ग किंवा जळजळ असेल तर ते वापरू नका. हे काजळ जास्तीत जास्त १ आठवडा वापरा त्यानंतर पुन्हा नवीन बनवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.