Nauvari Saree Designs : अक्षय तृतीयेला 'असा' करा मराठमोळा लूक, नऊवारी साडीच्या पाहा सुंदर डिझाइन्स

Shreya Maskar

अक्षय तृतीया

यंदा २०२६ मध्ये अक्षय तृतीया १९ एप्रिल रविवारी आली आहे. या सणाला छान मराठमोळा पारंपरिक लूक करा. नऊवारी साडीच्या सुंदर डिझाइन्स पाहा.

Akshaya Tritiya | pinterest

नऊवारी साडी

नऊवारी साडीमध्ये खूप सुंदर प्रकार येतात. यात पेशवाई, ब्राह्मणी, काष्टा साडी आणि रेडीमेड नऊवारीही येते.

The Nauvari Saree | pinterest

रेडीमेड नऊवारी

रेडीमेड नऊवारीमध्ये पैठणी, सिल्क, कॉटन आणि ब्रोकेड स्टाईल्स खूप लोकप्रिय आहेत. पैठणी नऊवारी सर्वात महागडी आणि लग्न, समारंभासाठी खास आहे. सुती आणि रेशमी मिश्रणातून बनते.

Ready-made Nauvari | pinterest

पेशवाई नऊवारी

पेशवाई नऊवारी साडी धोतरासारखी नेसली जाते. यात महिला अधिक रुबाबदार दिसतात. पेशवाई नऊवारी राजेशाही थाटाची असून पैठणी किंवा भारी सिल्क कापडापासून बनवली जाते.

Peshwai Nauvari | pinterest

ब्राह्मणी साडी

ब्राह्मणी साडी ही अगदी पारंपरिक आहे. ब्राह्मणी नऊवारी साडी 'काष्टा' पद्धतीने नेसली जाते. जी सरळ रेषेत असते. दिसायला अत्यंत सुसंस्कृत आणि पारंपारिक वाटते.

Brahmani Saree | pinterest

काष्टा साडी

काष्टा साडीला 'लुगडे' असेही म्हणतात. जी महाराष्ट्रातील सर्वात पारंपरिक शैली आहे. जिथे साडीच्या मध्यभागी पदर घेऊन तो मागे खोचला जातो.

Kashta Saree | pinterest

रंगाची निवड

उन्हाळ्याच्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी नऊवारी साडीमध्ये पेस्टल रंगांची निवड उत्तम ठरते. यामध्ये पुदीना हिरवा, लिंबू पिवळा, आकाशी निळा , लाव्हेंडर आणि बेबी पिंक यांसारख्या रंगाचा समावेश आहे.

Color Selection | pinterest

नऊवारी साडी ब्लाउज

उन्हाळ्यात नऊवारी साडीवर सुती , चंदेरी किंवा लिनन कापडाचे ब्लाउज घालवे. स्लीव्हलेस ब्लाउज , हाफ स्लीव्हलेस असलेले ब्लाउज उन्हाळ्यात आरामदायी आहेत. पारंपरिक लूकसाठी पैठणी किंवा सुती साड्यांवर कॉन्ट्रास्ट रंगांचे, डीप व्ही-नेक किंवा बोट नेक पॅटर्न उत्तम दिसतात.

Nauvari Saree Blouses | pinterest

NEXT : आईची जुनी प्रिंटेड साडी 'अशी' करा स्टाइल, लोक तुमच्याकडे एकटक पाहतच राहतील

Plan Saree Designer Blouse | pinterest
येथे क्लिक करा...