Monsoon Tips: पावसाळ्यात घरातील कुबट वास होईल गायब, फक्त पाण्यात उकळा 'या' ५ वस्तू करते

Sakshi Sunil Jadhav

पावसाळ्यात दुर्गंधी का येते?

पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढल्याने घरात ओलावा साचतो आणि बुरशी तसेच जीवाणूंची वाढ जलद होते. त्यामुळे घरात शिरताच कुबट वास जाणवतो.

damp smell removal

नैसर्गिक उपाय

रासायनिक फ्रेशनरचा सतत वापर करण्यापेक्षा घरातली स्वच्छता आणि नैसर्गिक सुगंधाचा वापर जास्त फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे घरातलं वातावरणही जास्त ताजेतवाने राहील.

damp smell removal

लिंबाचे साल

एका भांड्यात पाणी घेऊन त्यात लिंबाची साल आणि एक-दोन तमालपत्र टाकून उकळा. त्यामुळे घरभर हलका, ताजा सुगंध पसरतो आणि दुर्गंधी कमी होते.

natural air freshener

कॉफीची दरवळ

पाण्यात दोन चमचे कॉफी टाकून मंद आचेवर उकळल्याने तिचा सुंगध घरात पसरतो.

natural air freshener

संत्र्याच्या सालींचा वापर

ताज्या किंवा वाळवलेल्या संत्र्‍याच्या साली पाण्यात उकल्याने नैसर्गिक सिट्रस सुगंध घरभर दरवळो आणि बंद वातावरणात कुबट वास कमी होतो.

natural air freshener

लवंग उकळा

पाण्यात काही लवंगा टाकून उकळल्याने मसाल्याचा नैसर्गिक सुगंध हवेत पसरतो. त्यामुळे घरातले वातावरण जास्त प्रसन्न वाटतं. natural cleaning hacks

natural air freshener

स्वच्छता ठेवा

सर्व उपाय प्रभावी ठरावेत यासाठी घरातला ओलावा कमी ठेवा, रोजच्या रोज साफसफाई करा आणि बुरशी होऊ न देऊ नका. स्वच्छ घरात दुर्गंधीची शक्यता कमी असते.

natural cleaning hacks

टीप

हे उपाय घरात सुगंध निर्माण करण्यासाठी आणि वातावरण ताजेतवाने ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. हवेत असलेले सर्व जीवाणू नष्ट होतात किंवा कोणत्याही आजारांवर उपचार होतो, असा वैज्ञानिक निष्कर्ष उपलब्ध नाही.

natural cleaning hacks

NEXT: iPhone पेक्षाही महाग BSNL चा सॅटेलाइट फोन! नेटवर्कशिवायही करता येणार कॉल

BSNL Satellite Phone | google
येथे क्लिक करा