ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी गरम पाण्याची वाफ घेणे उपयुक्त आहे. यामध्ये काही गोष्टि पाण्यात टाकल्याने लवकर आराम मिळू शकतो.
पाण्यात मीठ टाकल्याने नाक मोकळे होऊन श्वास घेण्यास मदत होते.
वाफेत पुदिन्याची पाने किंवा तेल घातल्याने श्वसनमार्गाला आराम मिळतो.
घसा खवखवणे आणि खोकल्यासाठी वाफेत लवंगाचे तेल घालणे फायदेशीर आहे.
आल्याचा रस वाफेच्या पाण्यात टाकल्याने नाक आणि घस्याची सूज कमी होते.
पाण्यात तुळशीची पाने मिक्स केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
ओवा गरम पाण्यात टाकल्याने घसा मोकळा होवून खोकल्यास आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.