ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला ग्लोइंग स्किन हवी असते पण खुप वेळा बाहेरील प्रोडक्ट्समुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते
अशा परिस्थितीत घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. जाणून घ्या काय केले पाहिजे.
एॅलोव्हेरा जेल आणि बीट त्वचेसाठी बेस्ट आहेत आणि त्यांचा नियमित वापर केल्याने तुमच्या त्वचेवर गुलाबी चमक येऊ शकते.
एॅलोव्हेरा जेल त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि उन्हामुळे होणाऱ्या जळजळीपासून आराम देते.
बीटचा रस त्वचेला डिटॉक्सिफाई करतो आणि त्वचेचा रंगही सुधारतो.
तुम्ही एॅलोव्हेराचा गर बीटरूटच्या रसात मिसळून दररोज चेहऱ्यावर आणि ओठांवर लावू शकता.
हे दोन घटक त्वचेची वृद्धत्वाच्या प्रक्रियेला मंद करतात आणि त्वचेला मुलायम देखील बनवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.