Natural Hair Care: कंडिशनिंग सोडा! केसांसाठी फक्त १ गोष्ट वापरा; कोरडे-फ्रिझी केस होतील सॉफ्ट आणि चमकदार

Sakshi Sunil Jadhav

केसांच्या समस्या

आजकाल अनेक जण केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझीनेसच्या समस्यांनी वैतागलेत. केमिकलचे प्रॉडक्ट्स, चुकीचा आहार आणि प्रदूषण यामुळे केस कमकुवत होतात. अशावेळी घरगुती आणि नैसर्गिक उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतात.

home remedy for frizzy hair

प्रमुख कारणे

केमिकलचे शॅम्पू, हेअर स्टाइलिंग प्रॉडक्ट्स, पोषणाची कमतरता आणि प्रदूषणामुळे केस कोरडे व फ्रिझी होतात. त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात.

frizzy hair solution

नैसर्गिक कंडिशनर

घरगुती कंडिशनरमध्ये केमिकल नसतं. त्याने केसांचं कमी नुकसान होतं आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.

homemade conditioner

अॅलोवेराचे फायदे

अॅलोवेरा टाळूला थंडावा देतो, केसांना मॉइश्चर देतो आणि फ्रिझीनेस कमी करण्यास मदत करतो.

homemade conditioner

अॅलोवेरा कंडिशनर कसे बनवावे?

२ चमचे अॅलोवेरा जेल घ्या. त्यात १ चमचा नारळाचं तेल, अर्धा चमचा मध आणि थोडं कोमट पाणी मिक्स करा. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.

aloe vera benefits for hair

वापरण्याची योग्य पद्धत

केस धुतल्यानंतर हे ताजे मिश्रण केसांवर लावा. ५-१० मिनिटे ठेवून स्वच्छ पाण्याने धुवा. हे मिश्रण साठवून ठेवू नका.

hair care at home

अॅलोवेरा-गुलाबपाणी कंडिशनर

२ चमचे अॅलोवेरा जेलमध्ये थोडे नारळ तेल आणि १ चमचा गुलाबपाणी मिसळा. शॅम्पूनंतर केसांवर लावून ५ मिनिटांनी धुवा.

hair care at home

इतर नैसर्गिक पर्याय

दही-मध मिश्रण, केळी आणि ऑलिव्ह ऑइल पॅक, फक्त अॅलोवेरा जेल किंवा अळशीच्या बियांचे जेल हेही उत्तम नैसर्गिक कंडिशनर आहेत.

hair care at home

NEXT: Titvi Bird: रातोरात कोट्याधीश होता येतं? टिटवीच्या अंड्यांचे हे रहस्य तुम्हाला माहितीये का?

lapwing bird | google
येथे क्लिक करा