ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केसांना रंग देणे हा एक सामान्य ट्रेंड बनला आहे, पण त्यातील केमिकलमुळे बरेच लोक ते टाळतात. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी स्वतःचा ब्राऊन हेअर कलर तयार करू शकता.
यासाठी तुम्हाला कॉफी पावडर, मेहंदी पावडर आणि चहा पावडर इत्यादी साहित्य लागेल.
सगळ्यात आधी २ ते ३ चमचे चहा पावडर पाण्यात टाकून उकळून घ्या आणि ते पाणी गाळून बाजूला ठेवून द्या.
आता मेहंदी आणि कॉफी पावडर मिक्स करुन घ्या. त्यात चहा पावडरचे पाणी टाकून जाड पेस्ट करुन घ्या.
तयार केलेल्या पेस्टला केसांच्या मुळांपासून ते टोकांपर्यंत लावा. लावल्यानंतर काहीकाळ तसेच ठेवून द्या.
काही वेळाने तुमचे केस तुम्ही शॅम्पूने धुवा आणि कंडिशनर देखील लावू शकता.
तुमच्या केसांना हलका ब्राऊन कलर येईलच पण, केस पूर्वीपेक्षा अधिक मऊ आणि चमकदारही होतील.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही हेअर मास्क, फेस मास्क, उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.