Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
अभिनेत्रीने तिच्या सौंदर्यामुळे सर्वांनाच घायाळ केले आहे. चाहते तिला नॅशनल क्रश बोलत आहेत.
गिरीजा ओकचे सुंदर फोटो व्हायरल झाले आहेत. गिरीजा ओक चाहत्यांची लाडकी बनली आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? तुमची लाडकी गिरीजा ओक कशी दिसायची? सोशल मीडियावर गिरीजाचे जुने फोटो समोर आले आहेत.
गिरीजा लहानपणी अतिशय गोंडस दिसत होती. या फोटोमध्ये गिरीजा तिच्या आईसोबत दिसत आहे.
तिच्या डोळ्यात जादू आहे. तिचं हासरं सौंदर्य आजही घायाळ करत आहे.
गिरीजाचे हे देखील फोटो व्हायरल होत आहेत नेटकरी फोटोंना लाईक्स करत आहेत.
गिरिजाने कॉलेजमधूनच अभिनयाला सुरुवात केली. तिने सुरुवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता.
गिरीजाने मालिका आणि चित्रपटातून तिच्या अभिनयाला सुरूवात केली आहे.
गिरिजाने २०१० साली 'लज्जा' मालिकेत काम केले होते. त्यातील गिरिजाची मानसी ही भूमिका लोकप्रिय झाली होती.