Ruchika Jadhav
नाशिकचं त्र्यंबकेश्वर हे एक धार्मीक स्थळ आहे. अनेक भाविक येथे दरवर्षी भेट देतात.
मुक्तिधाममध्ये महाभारत आणि भगवान कृष्ण यांच्या जीवनाविषयी शिलालेख कोरलेले आहेत.
गोदावरी नदीवरील पवित्र घाट म्हणजे नाशिकचा रामकुंड मानला जातो. भगवान रामाने आपल्या वडिलांचा अंत्यविधी येथे केला होता असंही म्हटलं जातं.
पांडव लेणी येथे जाण्यासाठी पांडव लेणी रोड, बुद्ध विहार, पाथर्डी फाटा असा मार्ग आहे.
अंजनेरी हिल्स त्र्यंबकेश्वरपासून १० किमी अंतरावर आहे. थंडीच्या दिवसांत अंजनेरी टेकडीवर दाट धुक्याची चादर पसरलेली असते.
दुगरवाडी धबधबा दिवाळीमध्ये देखील या धबधब्यावर पाणी वाहत असते.
सीता गुफा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी वनवासात असताना माता सीता येथे आल्या होत्या असं म्हटलं जातं.
नाशिकमध्ये अनेक पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. तुम्ही देखील थंडीच्या दिवसांत येथे फिरण्याचा प्लान करत असाल तर या ठिकाणी नक्की भेट द्या.