Manasvi Choudhary
घरात अचानक पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी काय जेवण किंवा नाश्ता बनवावा, याचीकटकट महिलांना असते. अशा वेळी जर झटपट, खमंग आणि काहीतरी हटके बनवायचे असेल, तर नाशिकची प्रसिद्ध मिसळ थाळी हा पर्याय निवडू शकता.
यासाठी घरीच अस्सल नाशिक स्टाईल मिसळ थाळी कशी बनवायची, याची स्टेप बाय स्टेप सोपी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, सुक्या खोबऱ्याचे वाटण, मसाला, हळद, धने-जिरे पावडर, गरम मसाला, तीळ, आलं- लसूण पेस्ट, कांदा- लसूण मसाला, कोथिंबीर, पुदिना पाने, मीठ, तेल, फरसाण आणि लिंबू हे साहित्य घ्या.
मिसळ बनवण्यासाठी सर्वातआधी कढई मधे गरम तेलामध्ये कांदा, सुके खोबरे, तीळ चांगले भाजून घ्या. नंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड करा.
मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले मिश्रण आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना घालून मिश्रण बारीक वाटून घ्या.
गॅसवर एका कुकर मध्ये गरम तेलामध्ये जीरे, हिंग आणि कडिपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा याची फोडणी द्या
नंतर या मिश्रणात टोमॅटो, मसाला, हळद, गरम मसाला, धणे जीरे पावडर आणि कांदा लसूण मसाला मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यात खोबऱ्याचे वाटण मिक्स करा.
वाटण परतून घेतल्यानंतर त्यात मीठ आणि कोकम मिक्स करा. नंतर या मिश्रणात मोड आलेली मटकी आणि पाणी घालून मिसळ शिजवण्यासाठी कुकरचे झाकण लावा.
अशाप्रकारे मटकीची झणझणीत उसळ तयार झाली की एका प्लेटमध्ये एका वाटीमधे मटकी उसळ, एका बाजूला मधे उसळीची तर्री, दुसऱ्या एका वाटी मधे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, लिंबू आणि २ पाव असे सजवून घ्या.