प्राचीन ज्योतिर्लिंगांपासून ते शांत नदीकाठच्या मंदिरांपर्यंत; नाशिकमधील 'या' १० प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Manasvi Choudhary

नाशिक प्रसिद्ध ठिकाण

नाशिक हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थिक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. अध्यात्म आणि निसर्गाचा सुंदर संगम या ठिकाणी पाहायला मिळतो.

Nashik Picnic Spot

त्र्यंबकेश्वर

१२ ज्योतिर्लिंगांपाकी एक म्हणजे त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग नाशिक मध्ये आहे.  ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे प्रतीक असलेली तीन लहान लिंगे येथे आहेत . संपूर्ण देशभरातून भाविक नाशिक येथे भेट देतात.

Nashik Picnic Spot

काळाराम मंदिर

काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर पेशवेकालीन वारसा जपतोय. प्रभू रामचंद्र वनवासात असताना पंचवटी परिसरातच वास्तव्यास होते, त्यामुळे या परिसराला पंचटवी असे नाव पडलं आहे.

Kalaram Temple | google

कपालेश्वर मंदिर

काळाराम मंदिराच्या अगदी जवळ असलेले कपालेश्वर एकमेव असे शिवमंदिर आहे, जिथे मंदिराच्या दारात 'नंदी' नाही

Nashik Picnic Spot

गंडेश्वर मंदिर

नाशिकपासून साधारण ३० किमी अंतरावर सिन्नर येथे गंडेश्वर मंदिर आहे या मंदिराच्या मध्यभागी मुख्य शिवमंदिर असून भोवती सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणपतीची चार उप-मंदिरे आहेत.

Nashik Picnic Spot

सोमेश्वर मंदिर

सोमेश्वरी मंदिर हे गोदावरी नदीच्या संथ प्रवाहाकाठी वसलेले हे नाशिकमधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे.

Someshwar Temple

नवश्या गणपती मंदिर

आनंदवल्ली भागात गोदावरी नदीच्या काठावर स्थित हे पेशवेकालीन मंदिर आहे. निसर्गरम्य वातावरण आणि भक्तांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे.

Nashik Picnic Spot | google

सप्तश्रृंगी मंदिर

नाशिक जवळील वणी येथे साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी मातेचे मंदिर डोंगरावर वसलेले आहे.

Saptashrungi Devi

NEXT: घरात जिकडे तिकडे झुरळं दिसतायेत? ही सोपी ट्रिक वापरा, झुरळ जातील मरून

येथे क्लिक करा...