Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात घरामध्ये झुरळ होण्याचा त्रास वाढतो. किचनमध्ये झुरळाचा त्रास महिलांना अधिक सहन करावा लागतो.
झुरळे होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे अस्वच्छता, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे यामुळे उष्णतेच्या शोधात झुरळे घरामध्ये शिरतात.
झुरळांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, पोटाचे आजार होऊ शकतात यामुळे झुरळांवर वेळीच उपाय करणे महत्वाचे आहे.
बाजारामध्ये झुरळ मारण्याचे अनेक औषधी मिळतात मात्र अनेकदा ही औषधे वापरूनही घरातील झुरळे कमी झालेली दिसत नाही.
यासाठी आज आम्ही तुम्ही नैसर्गिक घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही घरीच झुरळांना पळवून लावू शकणार आहात.
बेकिंग सोडा आणि साखर हे झुरळांना पळवून लावण्यासाठी प्रभावी उपाय आहे.
साखरेच्या वासाने झुरळे आकर्षित होतात तर बेकिंग सोडा शरीरात गेल्याने झुरळ मरतील.
बेकिंग सोडा आणि साखर मिक्स करून ज्या ठिकाणी झुरळे आहेत तेथे टाका यामुळे झुरळे नायनाट होतील.
कांद्याचा रस आणि बोरिक अॅसिड मिक्स करून झुरळ असणाऱ्या ठिकाणी ठेवा यामुळे झुरळ पळून जातील.
लसूण हा नैसर्गिक किटकनाशक म्हणून काम करते. झुरळ असणाऱ्या ठिकाणी लसूण ठेवल्याने लसणाच्या वासाने झुरळ मरतील.
झुरळांना पुदीन्याचा वास सहन होत यामुळे तुम्ही पुदीन्याच्या पानांचा रस करून झुरळ असणाऱ्या ठिकाणी ठेवा.