Saam Tv
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्हातील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण आहे.
नुकताच अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. या काळात तुम्ही हिरवा निसर्ग पाहण्यासाठी नाशिकमधील पुढील ठिकाणांना भेट देऊ शकता.
नाशिकहून तुम्ही एका तासात त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊ शकता.
तिथेच तुम्ही कुशावर्त तीर्थस्थानी स्नान करू शकता.
तुम्हाला पावसाळ्यात खूप ट्रेकिंग करायची असेल तर अनजनेरी पर्वतावर तुम्ही जाऊ शकता.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे. तुम्ही इथे सकाळी ट्रेकिंगसाठी जाऊ शकता.
तुम्ही अनजनेरीला ट्रेकिंगला गेलात तर तिथेच गोरखगड आणि गणेशगडाला भेट देऊ शकता.