ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नाशिकमधून चोरीची एक धक्कादायक घटना समोर येत आहे.
नाशिकमधील राका कॉलनीमधील नवकार सोसायटीमध्ये 1 कोटीचे पेक्षा जास्त दागिने चोरीला गेले आहेत.
चोरी झालेल्या दागिण्यांमध्ये जुन्या दागिन्यांचाही समावेश असून माजी मंत्र्यांची हिऱ्यांची रत्नजडीत अंगठीचा समावेश असल्याची माहिती मिळत्ये.
नवकार सोसायटीमध्ये भरवस्तीत घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी cctv कॅमेराचा डिव्हिअर काडून घेतला होता.
परंतु घटनास्थळाच्या समोरच्या फ्लॅट बाहेरच्या cctv कॅमेऱ्यामध्ये हे सर्व दृष्य कैद झालं आहे.
दागिण्यांच्या चोरी बाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.