Ruchika Jadhav
रात्रीच्यावेळी माणसांनी झाडांना स्पर्श करू नये असं तुम्ही नेहमी ऐकलं असेल.
झाडं रात्रीच्यावेळी झोपलेली असतात त्यांना हात लावू नका असं सुद्धा तुम्ही अनेकदा ऐकलं असेल.
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीचं एक विशिष्ट महत्व आहे. त्यामुळे झाडांसाठी देखील काही नियम आखले आहेत.
माणूस आणि प्राणी यांप्रमाणे झाडे सुद्धा सजीव आहेत, असं मानलं जातं.
रात्री म्हणजे सूर्यास्तानंतर सर्वच प्राणी आणि सजीव झोपतात. त्यामुळे झोपलेल्या व्यक्तीला उठवणे अयोग्य समजले जाते.
सूर्यास्तानंतर रात्रीच्यावेळी झाडे ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड हवेत सोडतात.
आपण कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर सोडतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी झाडांजवळ जास्तवेळ थांबणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.