Shreya Maskar
नऱ्हे-आंबेगाव हा पुणे शहरातील दक्षिण उपनगर परिसर आहे, जो सध्या विकसित कामामुळे चांगलाच चर्चेत आहे. हा हिरवागार निसर्ग पाहायला वीकेंडला नक्की जा.
काही वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या नऱ्हे-आंबेगाव परिसरातील टेकडीला आता हिरवाई आणि जैवविविधतेचे नवे रूप आले आहे. येथील सौंदर्य जणू स्वर्गच आहे.
'झाडे लावा, झाडे जगवा फाऊंडेशन'च्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या परिसरात २३ हजारांहून अधिक वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे. नुकतेच येथील फुलपाखरू उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रकल्पासाठी प्रादेशिक वनीकरण विभागाची परवानगी मिळाली. निसर्ग अभ्यासक सुहास कडू यांनी उद्यानाच्या उभारणीसाठी मार्गदर्शन केले.
२०१८ मध्ये करण्यात आलेल्या पहिल्या वृक्षलागवडीपासून या उपक्रमाचा विस्तार झाला आहे. सध्या परिसरात १८३ हून अधिक देशी वनस्पती प्रजाती, ७२ हून अधिक पक्षी प्रजाती आणि ३४ प्रकारची फुलपाखरे आढळतात.
वृक्षसंवर्धनासाठी २३ पाण्याच्या टाक्यांद्वारे सुमारे १ लाख १० हजार लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली आहे. तसेच, सुमारे ७ ते ८ हजार फूट भूमिगत पाइपलाइनद्वारे पाणी विविध भागांत पोहोचविले जाते.
टेकडीचे भविष्यात समृद्ध जंगलात रूपांतर करण्यासाठी मृदसंधारण, पाणीसाठा वाढविणे, शेतमळ्यांची दुरुस्ती, स्मृतीवन, वृक्ष परिचय केंद्र , कॅक्टस गार्डन तसेच ओपन नेचर क्लासरूम उभारण्याचे नियोजन आहे.
मुंबई टू पुणे ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर पुणे स्टेशनला उतरल्यावर रिक्षाने तुम्ही नऱ्हे-आंबेगाव येथे सहज पोहचू शकता.