Pune Fort : दोन शिखरे, भव्य इतिहास अन् स्वर्गाहून सुंदर निसर्ग; पुण्यात लपलाय 'हा' किल्ला

Shreya Maskar

पुणे

पुणे जिल्ह्यात नारायणगड हा डोंगरी किल्ला आहे. नारायणगाव आणि गडचीवाडी ही दोन गावे किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत.

Pune | google

नारायणगड

पुण्यापासून ८० किमी आणि मुंबईपासून सुमारे १८० किमी अंतरावर नारायणगड आहे. तुम्ही मुंबई ते पुणे ट्रेन प्रवास करा. त्यानंतर ट्रेन स्टेशन ते नारायणगावपर्यंत एसटी किंवा रिक्षाने प्रवास करा. नारायणगावपासून छोटो ट्रेक करा.

Narayangad | google

इतिहास

नारायणगड हे सातवाहन काळातील ऐतिहासिक ठिकाण आहे. किल्ल्याच्या शिखरावर हस्तामाता मंदिर आहे. येथे सुंदर दगडी कोरीव काम पाहायला मिळते.

History | google

खडकात कोरलेल्या पायऱ्या

नारायणगड किल्ल्याचा माथा साधारणपणे उत्तर-दक्षिण दिशेने विस्तारलेला आहे. उत्तरेकडील बाजूला एक साधी भिंत आणि चार साधे बुरूज आहेत. येथे खडकात कोरलेल्या पायऱ्या आहेत.

Steps carved into rock | google

किल्ल्याची रचना

नारायणगड हा सुमारे २० एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना तीव्र उताराच्या कडा आहे. उत्तर-दक्षिण आयताकृती रचना आणि पश्चिमेकडील बाजूस प्रवेशद्वार अशी याची मांडणी आहे.

Fort structure | google

किल्ला कोणी बांधला?

नारायणगड हा किल्ला मूळतः पहिले मराठा पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी १६१४ ते १७२० या काळात पुनर्निर्मित केला होता. त्यांच्या कार्यकाळात या किल्ल्याची मुख्य तटबंदी उभारण्यात आली आणि उर्वरित बांधकाम नंतर नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) यांच्या काळात पूर्ण करण्यात आले.

Who built the fort? | google

किल्ल्याचा उद्देश

जुन्नर-पैठण हा ऐतिहासिक व्यापारी मार्ग आणि आसपासच्या व्यापारी दऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि देखरेखीसाठी हा किल्ला बांधण्यात आला.

The purpose of the fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

fort | google

NEXT : सह्याद्रीतील दगडात कोरलेला अद्भुत किल्ला, पुण्यातील ‘हे’ ठिकाण जपतेय इतिहासाचा वारसा

Pune Fort | saam tv
येथे क्लिक करा...