ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दिवाळीच्या सणाची आतुरता सर्वांनाच लागली आहे. सगळीकडे दिवाळीची लगभग सुरु झालेली दिसून येत आहे.
दिवाळीतील दुसरा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये २० ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.
नरक चतुर्दशीला 'रूप चतुर्दशी' आणि 'काली चौदस' असे सुध्दा म्हटले जाते.
या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता म्हणूनच या दिवशी "असत्यावर सत्याचा विजय" साजरा केला जातो.
नरक चतुर्दशीच्या दिवशी चिबूड फोडून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. सूर्योदयापूर्वी उटणं लावून अंघोळ केल्याने शरीरशुद्धी व आरोग्य लाभते असे मानले जाते.
काही ठिकाणी या दिवशी पितरांचे तर्पण, विशेष पूजा आणि दीपदान करण्याचीही परंपरा आहे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर १४ दिवे लावावेत आणि त्यांचे तोंड दक्षिणेकडे ठेवावे.
नरक चतुर्दशीच्या दिवशी सकारात्मकता, आरोग्य आणि आनंदासाठी संकल्प करावा.