Shreya Maskar
नळदुर्ग हा उस्मानाबाद जिल्ह्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे.
नळदुर्ग किल्ल्यातील नर-मादी धबधबा खूप प्रसिद्ध आहे.
'नर' आणि 'मादी' हे दोन कृत्रिम धबधबे आहेत.
नर-मादी धबधब्याला पाणी बोरी धरणातून येते.
पावसाळ्यात बोरी नदीचा जलस्तर वाढल्यावर धरणाच्या दोन्ही बाजूंनी पाणी वाहते आणि धबधबे प्रवाहित होतात.
'नर-मादी' धबधब्यांचे सौंदर्य मनाला मोहून टाकते.
मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे मादी धबधबा प्रवाहित झाला आहे.
पावसाळ्यात 'नर-मादी' धबधबा पाहायला आवर्जून जा.