Shreya Maskar
नंदगाव समुद्रकिनारा हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात असलेला एक स्वच्छ, शांत आणि तुलनेने एकांत असलेला समुद्रकिनारा आहे. जो काशीद समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. तसेच मुरुड-अलिबाग रस्त्यावर अलिबागपासून अंदाजे ३० किमी अंतरावर आहे.
नंदगाव समुद्रकिनारा शांत वातावरण, पांढरी वाळू आणि नारळाच्या झाडांसाठी ओळखला जातो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
नंदगाव बीच जवळ बोईसर हे स्टेशन आहे. तुम्ही बोईसर रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही रिक्षा किंवा बसने नंदगाव समुद्रकिनाऱ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता.
नंदगाव बीचवरून तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे कॅम्पिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
तुम्हाला वॉटर राइड्स करायच्या असतील तर नंदगाव बीचवर नक्की जा. उदा. बनाना बोट राईड, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग
नंदगाव बीचजवळ ऐतिहासिक मुरुड-जंजिरा किल्ला आणि प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिर आहे. येथे नक्की फिरायला जा.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही नंदगाव समुद्रकिनाऱ्याला भेट द्या. येथे तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.